Page

गौराळा फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारांना दिली धडक, 4 जण जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वणी-मारेगाव महामार्गावरील गौराळा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 दुचाकीस्वारासहित 2 जण जखमी झाल्याची घटना आज 24 ऑगस्टला सांयकाळी 7 वाजताच्या दरम्यान, घडली. जखमीना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करून यवतमाळ येथे हलविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
प्रफुल्ल तोडासे (25), स्वप्निल तलांडे (25), संजय ठमके (38), उत्तम करमणकर (42) असे नावं असून हे चारही अपघातग्रस्त मारेगाव शहरातील रहिवासी आहे. दुचाकीने वणीहून मारेगाव कडे येत असतांना मारेगावहून जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने गौराळा फाट्याजवळ दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले, या अपघाताचे गांभीर्य बघून अज्ञात चारचाकी वाहनचालक  घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला असल्याचे समजते.
सदर घटना जनहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच  ताबडतोब ॲम्बुलन्स सहित घटनास्थळी दाखल होऊन समिर कुळमेथे, निलेश भेंडे, पंकज नेहारे, प्रफुल्ल उरकुडे, आकाश खामनकर, यांनी जखमींना ॲम्बुलन्स मध्ये टाकून मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलिस करित आहे.