Page

एस. पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : शि. प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठी जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे गीत सादर केले. घोडमारे सर, मेश्राम मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले,


कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बुजोने सर यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात तामगाडगे सर यांनी टिळकांच्या व अण्णा भाऊ साठेच्या जीवनावर प्रकाश टाकला.

 विद्यार्थी दशेत जिद्द चिकाटी मेहनत यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले सूत्रसंचालन बुजोने सर यांनी केले तर आभार आस्कर सर यांनी मानले.