उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
सावली : वर्षभर शेतकरी वर्ग ज्यांच्या भरोशावर शेती करत असतो. त्या बैलांचा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावली तालुक्यातील जिबगाव येथे अनेक वर्षांपासून ऐतिहासिक बैलांचा पोळा भरतो. मात्र कोरोना काळात दोन वर्षे या पोळाचे आयोजन नाममात्र करण्यात आले होते.
पिढ्यान् पिढ्या हा बैलांचा पोळा येथील सर्वधर्म समभावातून जोपासला जात आहे. स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पुर्वी पोळ्याच्या आदल्या दिवशी मोयबलला बैलांचे खांदे शेकत असतात. व दुसऱ्या दिवशी बैलांना रंगरंगोटी व सजावट केले जात असत. अशातच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिबगाव येथे . बैलांच्या जोड्यांच्या आंब्याच्या तोरणाखाली एकत्र येत असत. पोळ्यानिमित्त झळत्या म्हणत गावातील नागरिक हे बैलांच्या पाया व एकमेकांना टिका लावून नमस्कार घेत असतात. एकमेकांच्या घरी बैल जोडी नेवून भेट देत असतात.
पोळा पाहण्यासाठी गावातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर मिळेल त्याठिकाणी उपस्थित होते. या निमित्ताने जातीय सलोखा ठेवणे हि जिबगावची परंपरा आहे.