Page

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करा - सीमा स्वामी लोहराळकर


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड, (२ आक्टो.) : चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक नैसर्गिक आपत्तीने नेस्तोनाबूत केले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या या पहिल्या आठवड्यातील दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुंग, उडीद, भुईमूग सह आदी पिके नामशेष झाली आहेत तर, तर कापूस, मका, उस, मोसंबी, बाजरीचे पीक आडवी पडले. शेतकऱ्यांच्या शेतात कमरेच्या वर पाणी साचले असून आहे ते पिवळे पडले. नदी, नाले दुथडी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे उभे पिके वाहून गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली पंचनामे पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने त्वरित मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट आर्थिक मदत करत शासनाने प्रत्येक शेतकऱ्यांना ५०,०००/- हजार रुपयांची मदत जाहीर करावी असे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश मोर्चा च्या नांदेड जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहाराळकर मुख्यमंत्री यांना केली आहे.