Page

कासारबेहळ येथे ई-पिक पाहणी

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (०२सप्टें.) : शेतकऱ्यांना शेतीची माहिती तालुक्याला जाऊन हेलपाट्या मारण्यापेक्षा बांधावर स्वतः च जाऊन सुलभ आपली शेतीची माहिती भरता यावी म्हणून सरकार ने ई-पिक पाहणी प्रणाली अमलात आणली. या अनुषंगाने शेतकऱ्यांना ही ई-पिक पाहणी कशी वापरायची या करिता "ई-पिक पाहणी" कार्यक्रम कासारबेहळ व सेवा नगर येथे संपन्न झाला.

ई-पिक पाहणी द्वारे शेतकऱ्यांनी स्वतः बांधावर जाऊन आपल्या शेतीची माहिती भरायची आहे. असे न केल्यास शासकीय लाभ घेता येणार नाही. सात बारा कोरा असल्यास पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान यासारख्या योजनेचा लाभ मिळणार नाहीत असे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे वरील बाबींची अडचण येऊ नये याकरिता कासारबेहळ येथे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खडसे तलाठी यांनी ई- पिक पाहणी ची माहिती दिली. मात्र, अनेकांना नेटवर्क, मोबाईल वापर यांचा ताळमेळ व वेबसाईट लवकर न ओपन होणे, असा विविध प्रकार च्या प्रॉब्लेम येत असल्याने ई-पिक पाहणी बाबत उदासीनता शेतकऱ्यांत दिसून येत आहे. तर काहींनी उत्तम व सुलभ प्रणाली म्हणून कामकाज सोपं होईल असेही मत व्यक्त केली.

या वेळी खडसे तलाटी, उपसरपंच विष्णू जाधव, पोलीस पाटील अशोकराव करे, कोतवाल प्रविण वाहुळे,  शेतकरी भगवान पावडे, संदेश चेव्हान, शंकर पाटे, संजय पावडे, व दिलीप पिटलेवाड हे उपस्थित होते.